शेतकरी आयडी क्रमांक कसा मिळवायचा?
शेतकरी आयडी क्रमांक कसा मिळवायचा?
शेतकरी आयडी क्रमांक कसा मिळवायचा शेतकरी आयडी क्रमांक जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकरी आयडी क्रमांक मिळवू शकता
यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर agristak हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा. त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा. त्यानंतर यात विचारलेली सर्व माहिती भरा.
यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. व त्यानंतर तुमचं पूर्ण वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला शेतकरी आयडी क्रमांक मिळून जाईल.
शेतकरी आयडी क्रमांकाचा उपयोग कशासाठी होतो
शेतकरी आयडी क्रमांकाचा उपयोग आपल्याला शेतीच्या बऱ्याच कामासाठी होतो
आपल्याला शेतीच्या कामासाठी लागणारे अवजारांचा अनुदान जर आपल्या मिळवायचे असेल तर आपल्याकडे शेतकरी आयडी असणे आवश्यक आहे.
जर आपण ट्रॅक्टर खरेदी केला तर त्या ट्रॅक्टरच्या खरेदीवर मिळणारा जे अनुदान आहे ते अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला शेतकरी आयडी असणं आवश्यक आहे
जर आपल्याला नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकाचे नुकसान झालं तर आपल्याला त्या पिकाचा पिक विमा मिळवायचा असेल तर पिक विमा मिळवण्यासाठी आपल्याकडे शेतकरी आयडी नंबर असणे आवश्यक आहे जर आपल्याकडे शेतकरी नंबर नसेल तर आपल्याला पिक विमा हा मिळणार नाही. आपल्याकडे शेतकरी आयडी असेल तर आपल्याला पिक विमा मिळेल.
जर आपल्याकडे शेतकरी आयडी क्रमांक असेल तर आपल्याला बऱ्याच शेतीच्या अवजारांच्या किंवा बियाणांच्या खरेदीवर अनुदान मिळतं या सवलतीचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी आयडी असणं आवश्यक आहे.
शेतकरी ओळखपत्रासाठी पात्रता व अटी
१)शेतकरी आयडी काढण्यासाठी अर्जदारा शेतकरी असणे आवश्यक आहे
२) शेतकरी आयडी काढण्यासाठी अर्जदार दाराच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे
३) शेतकरी आयडी काढण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड व आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
४) शेतकऱ्याला आपल्या जमिनीची अचूक माहिती आवश्यक आहे
शेतकरी आयडी साठी आवश्यक असणारी कागदपत्र
१)आधार कार्ड
२)मोबाईल नंबर
३)सातबारा उतारा
४)आठ अ उतारा
५)बँक पासबुक व बँक खात्याचा तपशील
६)पासपोर्ट साईज फोटो
Post a Comment