भारतात शेती फायदेशीर बनवण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?
भारतात शेती फायदेशीर बनवण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?
आपला भारत देश हा कृषिप्रधान असलेला देश आहे. आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.
आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्यापैकी एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.
पीएम किसान योजना .
या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना दरमहा सहा हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत करण्यात येते.
ही मदत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात प्रदान करण्यात येते .
कारण आपल्या देशातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे आणि सध्या रासायनिक खतांचा दर हा वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खताचा वापर करणे परवडत नाही तरी पण शेतकरी रासायनिक खताचा वापर करत आहे.
भारतीय शेतकरी हा शेती करत असताना अनेक अडचणी येत असतात.
त्यातच हवामान बदलामुळे शेतीच होणार नुकसान जसं की वातावरण बदलामुळे अचानक होणारी ढगफुटी व त्यामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी यांची पीक नाहीशी होतात.
जर महापुरामुळे एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झालं तर त्या पिकाचा जर आपण पिक विमा केला असेल तर त्या पिकाची आपणास नुकसान भरपाई मिळते
भारतीय शेतकऱ्यांच्या शेतीत सुधारणा होण्यासाठी सरकारने नैसर्गिक शेतीचा पर्याय शेतकऱ्यांपुढे ठेवलेला आहे कारण सध्या खतांच्या किमतीत व बी बियाणांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे .
आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे उरलेला आहे . कारण सध्या नैसर्गिक शेती करणं ही काळाची गरज बनलेली आहे .
कारण नैसर्गिक शेतीसाठी अतिशय कमी प्रमाणात खत लागतं आणि ते खत आपल्याला निसर्गापासून मिळत. त्यामुळे नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागत नाही व चांगल्या प्रतीचे उत्पादन शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीपासून मिळत.
किसान क्रेडिट कार्ड योजना
जर शेतकऱ्यांना शेती करत असताना एखाद्या वेळी भांडवलाची कमतरता पडली तर त्यांना किसान क्रेडिट कार्ड मार्फत अल्पमुदतीचे कर्ज घेता येतं आणि या कर्जावर व्याजदर सुद्धा अतिशय कमी असतो. हा फायदा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा होणार आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा फायदा
प्रधानमंत्री पिक विमा योजना अतिशय कमी दरात उपलब्ध आहे व या पिक विम्याचा उपयोग आपल्याला . जर एखाद्या वेळेस मोठा पाऊस झाला व आपल्या पिकाचे नुकसान जर झालं. एखाद्या वेळेस जर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि महा पूर आला तर त्या पिकाची नासाडी होते आणि पीक पाण्याबरोबर वाहून जाते. किंवा एखाद्या पिकांना किडीचा प्रादुर्भाव झाला तर ते पिक वाया जाते अशातच जर आपण प्रधानमंत्री पिक विमा घेतला असेल तर आपल्याला त्या पिकाची भरपाई सहज मिळू शकते आणि हा विमा फक्त एक रुपयात भरता येतो.
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला विहीर योजना या योजनेअंतर्गत जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून नवीन विहीर खोदण्यासाठी जे शेतकरी असमर्थ आहे असे शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये पर्यंत मदत शासनामार्फत करण्यात येते. जर आपणास वर दुरुस्त करायची असेल तर शासनाकडून आपल्याला अडीच लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.
मागेल त्याला सोलर पंप योजना
मागेल त्याला सोलर पंप योजना ही महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येत असणारी एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.कारण सध्या शेती करत असताना वीज पुरवठा खंडीत झाला तर अशा वेळी शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके हि जळुन जातात कारण पाणी असुन देखील वीज पुरवठा खंडित झाला तर शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही.त्यासाठी आपल्या शेतात जर शेतकऱ्यांनी सोलर पंप जर बसवला तर शेतकऱ्यांना आपल्या पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होणार आहे.
कारण आता सोलर पंप हा सुर्य प्रकाशावर चालणार आहे.त्यामुळ त्यांना वीजेची गरज ही भासणार नाही.आणी त्यांना आणि आपल्या पिकांना वेळेवर पाणी देता येईल.
मागेल त्याला सोलर पंप योजना ही केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असणारी एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५एचपी 3 एचपी ,७एचपी यापैकी कुठल्याही एचपी ची मोटर आपण निवडायची आहे.
यापैकी ३एचपी मोटर जर आपण निवडली तर त्या मोटरीसाठी आपल्याला २२ हजार रुपये भरावे लागणार आहेत.
जर आपण ५एचपी मोटर निवडली तर आपल्याला त्या मोटरीसाठी३२ हजार रुपये भरावे लागणार आहेत.
जर आपण ७एचपी मोटर निवडली तर त्या मोटरीसाठी आपल्याला ४४ हजार रुपये भरावे लागणार आहेत.
Drip irrigation anudan yojna
प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना आणी मुख्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी आहेत त्यांना ठिबक सिंचन खरेदीवर ८० टक्के एवढे अनुदान मिळते.
या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडे स्वतः घ्या मालकीची जमीन असणं आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना drip खरेदीवर अनुदान मिळणार आहे.ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारी योजना आहे .या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना शेती करत असताना पाणी जर कमी आलं तर त्या शेतकऱ्यांना पाट पाणी देणे शक्य होत नाही.अशा वेळेस सर्वोत्तम पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे तो म्हणजे drip कारण जर शेतकऱ्यांनी आपल्या रानात जर dripकेली तर त्या पिकांना वेळेवर पाणी मिळेल आणी कमी पाण्यात पीकाची वाढ सुद्धा चांगली होईल.
Post a Comment