शेतकरी जीवन आणी त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी

शेतकरी जीवन आणी त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी 




Agriculture problems








शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ‌.आपल्या देशात शेतीसाठी उपयुक्त अशी शेतजमीन उपलब्ध आहे.


तरीपण आपल्या देशातील शेतकऱ्यांना हवं तेवढं उत्पादन शेतीतून मिळत नाही.



कारण जरी आपल्या देशातील शेतजमीन जरी सुपीक असली तरी पण आपल्या देशातील शेतकऱ्यांना कधी कधी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो.  


कारण आपल्या देशात कधी खूप मोठा पाऊस पडतो व त्या पावसामुळे आपल्या हातात आलेल जे  पीक आहे ते पीक पण निघून जाते.


कारण अचानक येणाऱ्या मोठ्या पावसामुळे पीक वाहून जातात.व त्यामुळे शेतकऱ्यांना हवं तेवढं उत्पादन मिळत नाही यामुळे शेतकरी हा  हवालदिल होऊन बसतो. 



   





जरी शेतकरी हा स्वतः अन्नधान्य पिकवत असला तरी तो माल ज्यावेळेस विक्रीसाठी उपलब्ध होतो. त्यावेळेस त्या मालाला आपल्याला हवा तेवढा बाजार भाव आपल्याला मिळत नाही


 व त्यामुळे शेतकरी निराश होऊन जातो.कारण बाजार पेठेत सतत  कधी एखाद्या पीकाला बाजार भाव जास्त मिळतो आणि त्या बाजार पेठेत मात्र एखाद्या दुसऱ्या पीकाला अतिशय कमी बाजार भाव मिळतो.








सध्या शेतीसाठी वापरण्यात येणारी जी खते आहेत ती खतांच्या किमती वाढल्या आहेत.व त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला 





शेतकरी जीवन 


शेतकरी जीवनाची सुरुवात सकाळी उठल्यापासून होते शेतकऱ्याचे जीवन अतिशय कष्टप्रद असे असते. सकाळी उठल्यापासून शेतीचे काम सुरूच असतात .
 



शेतकरी जीवन अतिशय व्यस्त अस जीवन आहे.कारण सकाळी लवकर उठून आपली जनावरे आहेत त्यांना चारा व पाणी देणे.



त्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या रानात जाव लागतं आणि त्यानंतर त्या नंतर त्या जनावरांना चारा आणुन ठेवावे लागते.त्यानंतर त्या शेतकऱ्यांना रानातील जे काम आहे ते कराव‌ लागत जसं की रानातील पिकाला पाणी देण्यासाठी रानात जाव ‌ लागत . त्यानंतर रानातील काम की रानात जर तन उगवल असेल तर  त्या तणांवर तणनशकाचे फवारणी करणे नाहीतर आपल्या रानात खुरपणी करून ते तर काढून घ्यावे लागते.









शेतकरी जीवनातील अडचणी


शेतकऱ्यांना शेतीसाठी बऱ्याच अडचणी येत असतात . कारण सध्या हवामानात सतत बदल होत आहेत.व त्यामुळेच शेतकऱ्यांना गरज नसेल त्या वेळेस पाउस पडतो आणि शेतकऱ्यांच्या हातात  काहीच उरत नाही . याउलट ज्या वेळेस शेतकऱ्यांना पाऊसाची गरज आहे.त्या वेळेस मात्र शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही व त्यामुळे त्यांची पिक ही पाण्यावाचून करपुन जातात.
 




आपल्या गावात असे बरेच लोक आहेत.ज्यांच आधार कार्ड अपडेट नाही.आधार कार्ड मधील नावांमध्ये बऱ्याच चुका आहेत.काही शेतकऱ्याकड स्वतःच रेशन कार्ड सुद्धा नाही.




शेतकऱ्यांना जर पीक पाण्याची नोंद करायची असेल तर ती कशी करावी हे सुद्धा त्या शेतकऱ्यांना माहिती नसते.कारण पीक पाण्याची नोंद करायची असेल तर आपल्याकडे इ पीक पाहणी करण्यासाठी मोबाईल मध्ये appअसण आवश्यक आहे.कारण जर इ पीक पाहणी app असेल तर पीकाची नोंद करू शकता.










आपल्याकडे जर Android mobile phone असेल तर आपण सर्व प्रथम आपल्या play Store वर जाऊन हे application डाऊनलोड करून घ्यावे.त्यानंतर  swipe करून आपला जो विभाग आहे तो विभाग निवडावा.


E pik pahani







नंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल.त्यानंतर तुम्ही शेतकरी म्हणून login करा याoptionवर क्लिक करा




E pik pahani







.इथ तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इंटर करायचा आहे.त्यानंतर पुढे जा वर क्लिक करा.त्यानंतर तुमच खातं निवडा हा पर्याय येईल जर तुम्ही खातेदार असाल तर निवडा या पर्यायावर क्लिक करा जर तुम्ही नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.




 त्यानंतर तुमचा विभाग निवडा त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा आणी त्या नंतर तुमच गाव येईल.त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर पहीलं नाव मधलं नाव आणी शेवटचं नाव टाकून त्या नंतर गट नंबर टाकून घ्यायचा आहे.त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.


E pik pahani






. त्यानंतर सांकेताक टाका त्यानंतर आपल्याला  पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर तुमचा खाते क्रमांक निवडा, गट क्रमांक निवडा त्या नंतर तुमच्या पीकाचा हंगाम निवडा पीकाचा वर्ग निवडा त्या नंतर तुमच क्षेत्र किती आहे ते निवडा आणी पुढे त्या नंतर पीकाची सर्व माहिती भरा.




E pik pahani

E pik pahani










.त्यानंतर सिंचनाची सोय कुठली आहे.जस की विहीर, कुपनलिका यापैकी पर्याय निवडा त्यानंतर दिनांक टाका पुढे 
 जा या पर्यायावर क्लिक करा.




 त्यानंतर आपल्या रानातील सर्व माहिती live location ला दाखवेल . त्यानंतर तुम्ही लोकेशन tress करून आपल्या पिकाचा liveफोटो काढा त्यानंतर पुढ जा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या पीकाची नोंदणी यशस्वी रित्या पुर्ण होईल.


No comments

Powered by Blogger.