शेतकरी ओळखपत्र महाराष्ट्र कसे डाऊनलोड करावे
शेतकरी ओळखपत्र महाराष्ट्र कसे डाउनलोड करावे
शेतकरी ओळखपत्र म्हणजे farmer id कस डाउनलोड करायचे ते आपण पाहूया. फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळखपत्र आपल्या agristack या एप वर जाऊन आपण आपले फार्मर आयडीची नोंद करू शकता. आपल्याला फार्मर आयडी चा उपयोग सर्व ठिकाणी होतो. जसं की एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही बँकेचा लोन घेण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी चा उपयोग होतो. फार्मर आयडी चा उपयोग आपल्याला कुठल्याही पिकाचा जर आपण विमा उतरला असेल तर तर त्या पीक विम्याची भरपाई आपणास पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याकडे फार्मर आयडी नंबर असणे आवश्यक आहे. फार्मर आयडी काढण्यासाठी सर्वप्रथम आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन agristack.gov.in या पेजवर जाऊन प्रथम आपण लॉगिन करून घ्यावे. त्यानंतर एनरोलमेंट स्टेटस वर क्लिक करावे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या माध्यमातून लॉगिन करावे. आणि त्यानंतर आपला आधार नंबर रजिस्ट्रेशन साठी नोंद करून घ्यावा. तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर डाऊनलोड सर्टिफिकेट या वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी प्रिंट मिळून जाईल.
शेतकरी ओळखपत्र महाराष्ट्र कसे डाउनलोड करावे त्यासाठी प्रोसेस काय आहे.
१)सर्वप्रथम आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन farmer ragistry करण्यासाठी जी वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावं
२) agristack.gov.in. या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे
३) त्यानंतर enrollment status यावर क्लिक करावे आणि आपल्या मोबाईल नंबर वरून किंवा मोबाईल नंबर वर येणाऱ्या ओटीपी वरून लॉगिन करावे.
४) त्यानंतर आपला आधार कार्ड नंबर रजिस्टर करावा तो आधार कार्ड नंबर जर रजिस्टर झाला. तर आपला फार्मर आयडी रजिस्ट्रेशन झालं आहे. तर मग आपण डाउनलोड farmer id या विकल्पावर क्लिक करून आपला फार्मर आयडी डाऊनलोड करून घेऊ शकता. आणि तो फार्मर आयडी तुम्हाला पीडीएफ च्या स्वरूपात सुद्धा घेता येतो.
शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती आहे
शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे. जर आपला आधार नंबर मोबाईलची लिंक असेल तर आपण आपल्या जवळच्या महा-ई-सेवक केंद्रात जाऊन आपलं शेतकरी ओळखपत्र डाऊनलोड करून घेऊ शकतो. आपण माही सेवा केंद्रात जाताना फक्त आपण आपलं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डशी लिंक असलेला आपला मोबाईल नंबर सोबत घेऊन जाव .
FAQ
शेतकरी फार्मर रजिस्ट्री मोबाईल ॲप किंवा वेब पोर्टलचा वापर करून स्वतःची नोंदणी करू शकतात . यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार करण्याकरिता सुरुवातीला साइन-अप करणे, त्यानंतर आधार वापरून ई-केवायसी पडताळणी करणे आणि मूलभूत तपशिलांसह अर्ज भरणे आवश्यक आहे.

Post a Comment