महाडीबीटी शेतकरी योजना 2026
महाडीबीटी शेतकरी योजना 2026
महाडीबीटी शेतकरी योजना 2026 ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.
महाडिबीटी शेतकरी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी जी शेती उपयुक्त अशी अवजारे आहेत अशा अवजारांच्या खरेदीवर ५० टक्के ते १००टक्के एवढे अनुदान देण्यात येते.
जर तुम्हाला महाडीबीटी शेतकरी योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही mahadbt.maharastra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता.
महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेती अवजारे जसं कि power trailor असेल किंवा नांगर किंवा रोटावेटर असेल अशा सर्व प्रकारच्या यंत्रावर अनुदान मिळते.
महाडीबीटी शेतकरी योजना 2026
१)महाडीबीटी शेतकरी योजना या योजनेअंतर्गत जर आपण शेतीसाठी ड्रोन खरेदीवर आपणास अनुदान मिळणार आहे.शेतीसाठी डोन खरेदीवर सरकार कडून ४० टक्के ते ७५ टक्के एवढे अनुदान मिळणार आहे.
२) जर आपण शेतीसाठी नांगर खरेदी केला तर त्या नांगराच्या खरेदीवर ४०टक्के ते ५०टक्के एवढे अनुदान मिळणार आहे.
३) जर आपण शेतीसाठी रोटावेटर खरेदी केला तर त्या खरेदीवर सरकारकडून 40% ते 50 टक्के एवढ अनुदान मिळणार आहे
४) जर आपण ठिबक सिंचन व तुषार सिंचन शेतीसाठी वापरणार असाल तर या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचनावर सुद्धा अनुदान मिळणार आहे
५) जर आपण सोलर पंप या योजनेअंतर्गत बसवणार असेल तर आपल्याला या योजनेअंतर्गत सोलर पंपावर सुद्धा अनुदान मिळणार आहे
महाडीबीटी शेतकरी योजना 2026 उद्देश काय आहे
महाडीबीटी शेतकरी योजना 2026 चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध शेतीच्या योजना आहेत त्या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता यावयासाठी आणि बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीबद्दल ज्या योजना आहेत त्या योजनेची माहिती नसते आणि या योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल 2026 या योजनेची सुरुवात करण्यात आली. जेणेकरून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रणेचा वापर करून आपली शेती ला सुविधा उपलब्ध करून देता येतील.
महाडीबीटी शेतकरी योजना उद्देश
१) शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे
२) जर आपण शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जर ठिबक सिंचन बसवलं तर आपल्याला शेतीसाठी पाणी अतिशय कमी लागणार आहे
३) शेतीसाठी उत्तम बियाणे यांचा वापर करणे आणि चांगल्या
खतांचा वापर करणे त्यामुळे आपल्या शेतीच्या उत्पादनात वाढ होईल
४) अल्पभूधारक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे
५) जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा शेतकऱ्यांना मदत करणे
६) शेती क्षेत्रातील ज्या योजना आहेत त्या योजनेची माहिती व त्या योजनेचा होणारा ला भ याबद्दल माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध आहे
Mhadbt पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या योजना
१) कृषी यांत्रिकीकरण योजना
२) ठिबक सिंचन योजना
३) मागेल त्याला शेततळे योजना
४) मागे त्याला सोलर पंप योजना
५) एक डीपी एक शेतकरी योजना
६) फळबाग लागवड योजना
७) विहीर अनुदान योजना
८) शेळीपालन अनुदान योजना
Mahabdt पात्रता व अटी
महाडीबीटी शेतकरी योजना 2026 या योजनेच्या पात्रता व अटी खालील प्रमाणे
१)महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
२)महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असणं आवश्यक आहे.
३)या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्याच आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे.
४)महाडीबीटी शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सातबारा व आठ अ असणं आवश्यक आहे.
५)महाडीबीटी शेतकरी योजना 2026 चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हा आधार कार्ड शी लिंक केलेला असावा.
महाडीबीटी शेतकरी योजना 2026 आवश्यक कागदपत्र
१) आधार कार्ड
२) सातबारा उतारा
३) आठ अ उतारा
४) मोबाईल नंबर
५) बँक पासबुक झेरॉक्स
६) पासपोर्ट साईज फोटो
७) फार्मर आयडी
महाडीबीटी अर्ज
जर आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर २०२६-२७ इंडिया वर्षासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. Mahabdt.maharastra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं आवश्यक आहे
सर्वात प्रथम तुम्ही महाडीबीटी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. त्यानंतर महाडीबीटी फार्मर पोर्टल वर जाऊन शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करा
अर्ज कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती
१)नोंदणी कशी करावी किंवा लॉगिन कसे करावे
प्रथम तुम्ही महाडीबीटी फार्मर पोर्टल वर जा.
२)जर तुम्ही महाडीबीटी पोर्टल प्रथम वापरत असाल तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन करावे .
३)त्यानंतर तुमचा आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्यापाशी असणे आवश्यक आहे .
४) त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच तुम्हाला ओटीपी येईल व ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी टाकून तुम्ही लॉग इन करा
५)त्यानंतर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या योजना निवडा
६)त्यानंतर तुमची आवश्यक असणारी कागदपत्र अपलोड करा
७)आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा तुमचा रजिस्ट्रेशन होईल.
FAQ
महाडीबीटी शेतकरी म्हणजे काय?
महाडीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा सुरू केले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने नोंदणी करता येईल आणि कृषी विभागाच्या योजनांअंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करता येईल . वर्ष २०२५-२६ पासून, अर्ज निवडीसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" हा दृष्टिकोन वापरला जाईल.
शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्याद्वारे आर्थिक मदत, पीक विमा आणि अनुदानाचा लाभ मिळतो. प्रमुख योजनांमध्ये पीएम-किसान (₹६०००/वर्ष), नमो शेतकरी महासन्मान निधी (₹६०००/वर्ष), आणि पीक विमा योजना (PMFBY) यांचा समावेश आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२,००० पर्यंत थेट मदत मिळते.
प्रमुख सरकारी शेतकरी योजना 2026:
- आर्थिक सहाय्य योजना:
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN): पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,००० तीन हप्त्यांत मिळतात.
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना: महाराष्ट्र सरकारतर्फे वार्षिक ₹६,००० ची अतिरिक्त मदत.
- प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY): ६० वर्षांनंतर दरमहा ₹३,००० पेन्शन देणारी योजना.
- पीक विमा आणि संरक्षण:
- प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY): नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण.
- राज्य सहाय्यित पीक विमा योजना: कमी प्रीमियममध्ये विमा सवलत.
- कृषी अवजारे आणि सिंचन अनुदान:
- महा-DBT कृषी अनुदान: शेती अवजारे, ट्रॅक्टर आणि ठिबक सिंचनासाठी ५०% पर्यंत अनुदान.
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY): शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी मदत.
- इतर महत्त्वाच्या योजना:
- किसान क्रेडिट कार्ड (KCC): कमी दरात शेतीसाठी कर्ज सुविधा.
- मृद आरोग्य पत्रिका (Soil Health Card): जमिनीच्या सुपीकतेनुसार खतांच्या वापरासाठी मार्गदर्शन.
- जलयुक्त शिवार अभियान: पाणी साठवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारची योजना.

Post a Comment