भारतात कोणत्या प्रकारची शेती आहे

Sachin Pawar
By -
0

 भारतात कोणत्या प्रकारची शेती आहे

आपल्या भारतात बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती आहे आणी बऱ्याच लोकांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे .तस पाहिला गेल तर आपल्या देशात बऱ्याच प्रकारची शेती केली जाते बागायती शेती ,ऊस शेती ,केळी,मका शेती आपल्या देशात बऱ्याच प्रकारची शेती केली जाते ते खालील प्रमाण 


१)रासायनिक शेती =ही शेती करत असताना प्रामुख्यान रासायनिक खत व कीटकनाशक यांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. रासायनिक शेती करत असताना शेतकऱ्यांना प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा खर्च करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचा खतांवर होणारा खर्च हा वाढत जातो त्यामुळे रासायनिक खते शेतीवर वापरणे परवडत नाही रासायनिक खताचा वापरामुळे जमिनीचा पोत कमी होऊन उत्पादन क्षमता कमी होतो





२) सेंद्रिय शेती= सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक खत जसं शेणखत असेल किंवा कुजलेलं खत असेल अशा नैसर्गिक खतापासून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय सेंद्रिय शेती करण्यासाठी आपण गाईचे गोमूत्र सुद्धा वापरू शकतो . सेंद्रिय शेती पिकवण्यासाठी कुठल्याही रासायनिक खताचा वापर करावा लागत नाही सेंद्रिय शेती करण्यासाठी फक्त आणि फक्त नैसर्गिक खतांचा वापर करण्यात येतो त्यामुळे सेंद्रिय शेती हे खूप फायदेशीर आहे कारण सेंद्रिय शेतीवर इतर शेतीच्या तुलनेत होणारा खर्च कमी आहे आणि उत्पादन क्षमता ही जास्त आहे. सेंद्रिय शेतीत ज्ञानेश्वर बोडके सारख्या शेतकऱ्यांनी फार मोठ योगदान दिलं आहे त्यांनी सेंद्रिय शेती करून करोडोची उलाढाल केली आहे त्यांनी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कसे उत्पादन घ्यायचे याबद्दल मार्गदर्शन सुद्धा केले आहे पॉलिहाऊस च्या माध्यमातून त्यांनी सेंद्रिय भाजीपाला पिकवला आहे व त्यात सर्व भाजीपाला आहे व त्या भाजीपाल्याची विक्री ते थेट ग्राहकापर्यंत करतात त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर नफा होतो कारण ग्राहक ते थेट शेतकरी अशी विक्री ते करतात त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात भाजीपाला मिळतो आणि शेतकऱ्यांनाही तो भाजीपाला विकण्यास परवडतो. त्यांनी पॉलिहाऊस च्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला विकून प्रत्येक दिवशी दोन हजार रुपये चा नफा मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले आहे त्यांनी त्यांचा अभिनव फार्मिंग या नावाने ग्रुप स्थापन केलेला आहे या ग्रुपमध्ये बरेच शेतकरी सामील आहेत आणि सर्वजण मिळून या ग्रुप मध्ये शेतीची कामे करत आहेत आता त्यांच्याबरोबर सुशिक्षित तरुण सुद्धा जोडले गेले आहेत आणि त्यांचे बरोबर आता बरेच इंजिनियर सुद्धा आहेत त्या इंजिनिअर मुलांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय कमी किमतीत शेतीसाठी उपयोगी अशी अवजारे ती मुलं बनवत आहे जसं की पावर ट्रेलर असेल कारण पावर ट्रेलर जर आपण बाहेर जर एखाद्या कुठल्याही कंपनीचा जर खरेदी केला तर त्या पॉवर ट्रेलर ची किंमत जास्त आहे व ते घेणे शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे ज्ञानेश्वर बोडके यांनी अतिशय कमी व माफक दरात पावर ट्रेलर उपलब्ध केले आहे व ते शेतीसाठी फार उपयोगी आहे.







३)फळबाग शेती= आपल्या देशात फळबाग शेती सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते जसं की डाळिंब शेती असेल डाळिंबाची लागवड सुद्धा आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या डाळिंबाला खूप मागणी असल्यामुळे आपल्या देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळिंब शेती करतात डाळिंब शेतीवर जरी होणारा खर्च मोठा असला तरी पण शेतकरी डाळिंब शेतीकडे वळत चालला आहे




पेरू शेती=आपल्या देशात पेरू शेती पण मोठ्या प्रमाणावर केली जाते कारण सध्या पेरूला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.  पेरू शेतीवर होणारा जो खर्च आहे तो अतिशय कमी आहे व त्यामुळेच पेरू शेती ही परवडणारी अशी शेती आहे. 







आंबा शेती =आंबा शेती सुदधा खुप फायदेशीर अशी असणारी शेती आहे .जर तुम्ही आंबा शेतीबद्दल विचार करत असाल तर खालील माहीती वाचा





 







आंबा लागवड करण्यासाठी हवामान  व जमीन कशी असावी







आंबा लागवड करण्यासाठीच आपणास उष्ण व कोरडे हवामान असण आवश्यक आहे.









आंबा लागवड करण्यासाठीच चांगली जमीन व पाण्याचा निचरा होणारी जमीन असण आवश्यक आहे.











फुल बाग शेती

फुल बाग शेती सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा फुल शेतीकड आहे.कारण फुलाला सध्या बाजारात मोठया प्रमाणावर मागणी आहे. कारण फुलाचा उपयोग लग्न समारंभ असो किंवा कुठलाही इतर कार्यक्रम असला तर फुलाचा उपयोग करण्यात येतो. 



फुल शेती








४)पशुपालन शेती

भारतातील शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय केला जातो कारण शेतकऱ्याला शेतीला जोडधंदा म्हणून जर कुठला पर्याय उपलब्ध असेल तर पशुपालन आहे पशुपालन म्हणजे काय तर एखादं जनावर पाळणे जसं की गाय असेल किंवा म्हैस असेल या जाऊन पासून मिळणाऱ्या दुधाची विक्री करून त्यातून पैसे मिळवणे



पशुपालन शेती








किंवा कोंबड्या पालन करून सुद्धा पैसा कमवत
कोंबड्या पण करून त्याचे अंड्याचे विक्री करून त्यापासून सुद्धा पैसा कमवता येतो या प्रकारची शेती भारतात करण्यात येते
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
भारतात कोणत्या प्रकारची शेती आहे

भारतात कोणत्या प्रकारची शेती आहे

भारतात कोणत्या प्रकारची शेती आहे आपल्या भारतात बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती आहे आणी बऱ्याच लोकांची उपजीविका ही शेती…

By -