शेतकरी ओळखपत्र कसे बनवावे
शेतकरी ओळखपत्र कसे बनवावे
जर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी बनवायचा असेल तर आपण आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जावे. आणि आपण महा-ई-सेवा केंद्रात गेल्यानंतर त्यांना आपल्याला शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात याबद्दल विचारावे आणि ते सांगतील ते कागदपत्र त्यांच्याकडे आणून द्यावी. फार्मर आयडी काढण्यासाठी आपण आपला आधार कार्ड नंबर आणि आपला आधार लिंक मोबाइल नंबर सातबारा उतारा बँक पासबुक आणि आपले पासपोर्ट साईज फोटो घेऊन जावे आणि आपलं शेतकरी ओळखपत्र त्यांच्याकडून बनवून घ्याव
शेतकरी ओळखपत्र कसे बनवावे
१ )जर तुम्ही घरी बसून फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन करणार असाल तर mahadbt.maharastra.gov.in वर जाऊन शेतकरी नोंदणी पोर्टल ओपन करा
२)त्यानंतर न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडा
३)त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ओटीपी पडताळणी होईपर्यंत थांबा
४)त्यानंतर जमिनीची माहिती सातबारा भरा
५)त्यानंतर तुमच्या बँक क तपशील भरा
६)आणि त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा
७) ते तुमच्या दिलेल्या डॉक्युमेंट च सर्व पडताळणी झाल्यानंतर
तुम्हाला फार्मर आयडी मिळतो
शेतकरी ओळखपत्राचा उपयोग कशासाठी होतो
१)जर आपल्याला एखाद्या कंपनीचा पिक विमा उतरवायचा असेल तर तर आपल्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे कारण आपल्याला पिक विम्याचा लाभ फार्मर आयडी असल्याशिवाय घेता येणार नाही
२) जर आपल्याला एखाद्या कंपनीकडून अनुदान घ्यायचं असेल तर किंवा एखादा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जसं की आपण एखादा ट्रॅक्टर खरेदी केला तर तर त्या ट्रॅक्टरचा अनुदान आपल्या खात्यावर जमा होण्यासाठी आपल्याकडे फार्मर आयडी चा नंबर असणे आवश्यक आहे . फार्मर आयडी असेल तर आपल्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येते
३) जर आपण कुठल्याही बँकेचे कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेच कर्ज घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. किंवा आपल्याला कर्जावर काही सवलती पाहिजे असतील तर त्यासाठी सुद्धा फार्मर आयडी असणार आवश्यक आहे
४) आपल्याकडे फार्मर आयडी असल्यावर आपल्याला डीबीटी वरील ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार आहे
फार्मर आयडी बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) सातबारा उतारा व आठ अ उतारा
३) रहिवासी दाखला
४) बँक ऑफ पासबुक
५) मोबाईल नंबर
६) पासपोर्ट साईज फोटो
शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी पात्रता व अटी
पात्रता
१)जर आपल्याला शेतकरी ओळखपत्र काढायचे असेल तर सर्वप्रथम आपण भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
२)जर आपल्याला शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी काढायचा असेल तर आपल्या नावावर सातबारा किंवा एखादा असणे आवश्यक आहे
३)जर आपल्याला शेतकरी ओळखपत्र बनवायचा असेल तर आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे
४)फार्मर आयडी करण्यासाठी आपल्याकडे आपलं स्वतःचा बँक खाता असणे आवश्यक आहे . बँक खाता आधार कार्ड ची लिंक असलेल असाव
५)जर आपल्याला फार्मर आयडी काढायचा असेल तर शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा
अटी
१)जमिनीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे.
जसं की आपला गट नंबर सर्वे नंबर पिकाचा कुठला प्रकार आहे तो
२)एकाच शेतकऱ्याचे फार्मर आयडीवर नोंद होऊ शकते
३) फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक आहे
शेतकरी ओळखपत्राचे फायदे
१) जर आपल्याला सरकारी योजना आणि अनुदानही याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी ओळखपत्राचा खूप फायदा आहे
२) जर आपल्याला पिक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी असणे आवश्यक आहे
३) जर आपल्याला खत आणि बी बियाणांसाठी सवलत पाहिजे असेल तर फार्मर आपल्याकडे फार्मर आयडी असण
आवश्यक आहे
४) जर आपल्याला सर्व डीबीटी वरील योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे
५) जर आपल्याला पीक कर्ज व इतर कुठल्याही कर्जावर सवलत पाहिजे असेल तर आपल्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
Post a Comment