प्रधान मंञी पीक विमा योजना2025
प्रधान मंञी पीक विमा योजना2025
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2025 प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्र सरकारच्या मार्फत राबवण्यात येणारी योजना आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा नुकसान झालेला असेल तर त्या शेतकऱ्यांना त्या पिकाची नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येते .
प्रधान मंञी पीक विमा योजना ही आपल्या खरीप हंगामात लागवड करणारी पीक व रब्बी हंगामात लागवड केली जाणारी पीक यात यांचा समावेश आहे.ज्यात शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटापासून होणाऱ्या नुकसानीपासुन संरक्षण मिळते.रब्बी हंगामातील पिकासाठी पीक विमा भरण्याची शेवटची तारीख 31डिसेंबर 2025पर्यत आहे.
पीक विमा जर शेतकऱ्यानी काढला तर आपणास जर एखाद्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला तर त्या पीकाची नुकसान जर झाल तर आपल्याला नुकसान झालेल्या त्या पीकाची नुकसान भरपाई अपणास शासनाकडून मिळते.
सध्या वातावरणात सतत बदल होत आहे .व त्या बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणजेच आपल्या पिकावर कीडीची प्रादुर्भाव होत असतो .
प्रधान मंञी पीक विमा योजना2025
उद्देश
१)प्रधान मंञी पीक विमा चालु करण्यामागे शासनाचा हाच उद्देश आहे की जर शेतकऱ्यांच नैसर्गिक संकटामुळ जर त्यांच्या पीकांच नुकसान झाल तर त्या पीकास आर्थिक मदत मिळावी.
२) शेतकऱ्यांचा जर नैसर्गिक आपत्ती नुकसान झालं तर तर त्या शेतकऱ्यांना सुरक्षा कवच म्हणून विमा संरक्षण पुरवणे
३) शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येऊ नये यासाठी व त्यांना आपली शेती करता यावी यासाठी
४) नवीन व आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
प्रधान मंञी पीक विमा योजना2025 पाञता व अटी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी काही अटी व पात्रता
१) ज्या भागात पिक विमा चालू आहे त्या भागात या योजनेचा लाभ घेता येतो . त्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो
२) ज्या शेतकऱ्याकडे पीक कर्ज आहे ते शेतकरी आपोआपच या योजनेसाठी पात्र असतात
प्रधान मंञी पीक विमा योजना2025 आवश्यक कागदपञ
१)आधार कार्ड
२)बँक खात पासबुक
३)पीकाची माहीती
प्रधान मंञी पीक विमा योजना2025 विमा कव्हरेज
१)नैसर्गिक आपत्ती
२)कीड प्रादुर्भाव
३)भुरस्खलन
४)पीक काढल्यानंतर नुकसान झालेल
Post a Comment