भारतातील शेतीचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती आहेत
भारतीय शेतीचा ऱ्हास होण्याचे कारण बरीचशी आहेत त्यापैकीच एक आहे की सध्या वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळेच जमीनीची धूप ही मोठ्या प्रमाणावर होत आहे.स
ध्या पावसाच अनियमित पणा यामुळेच शेतकरी खूप निराश झाला आहे कारण जर पाउस हा वेळेवर झाला नाही तर पीक ही पाण्यावाचून करपून जातात व त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हातात फक्त आणी फक्त निराशा येते.त्यामुळेच शेतकरी हा शेतीपासून दुरावत चालला आहे आणी अनियमित पाऊस यामुळे शेतकरी हा निराश होत चाललेला आहे आणि शेती करण्याची त्याची मानसिकता होत नाही कारण सध्या पावसाची अनियमितता आणि महापूर यामुळे शेतकऱ्यांपुढं मोठं नैसर्गिक संकट निर्माण होत आहे कारण जर एखाद्या वेळेस शेतकऱ्यांनी आपल्या रानात पीक केले असेल आणि एखादे वेळेस जर पाऊस वेळेवर नाही पडला तर त्या ठिकाणी असणारे जे पीक आहे ते पाण्या वाचून करपून जाते
जर एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि महापूर आला तर पिके वाहून जातात व त्यामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि जर अशा वेळेस शेतकऱ्यांनी जर पिक विमा उतरला नसेल तर त्या शेतकऱ्यांना त्या पिकाची भरपाई सुद्धा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही येत नाही
आता शेतकऱ्यांची परिस्थिती सगळीकडे सारखी नाही बरेच शेतकरी हे शेतीसाठी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सोय वगैरे आहे त्या शेतकऱ्यांनी जरी उत्पादन चांगले घेतले तरी त्या शेतकऱ्याच्या पिकांना पाहिजे तेवढा योग्य असा हमीभाव मिळत नाही.
कारण आपल्या देशात पाणी कमी प्रमाणात आहे व त्यामुळे शेतकऱ्यांना ड्रिप इरिगेशन वाचून पर्याय नाही पण आपल्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शेतकऱ्यांना ड्रीप बसवणे शक्य होत नाही पण नाही शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक वाया जाते
भारतीय शेतकरी हा जरी खुप कष्ट करणारा जरी असला तरी आपल्या देशातील शेतकऱ्यांकड बघण्याचा दृष्टीकोन माञ बदलत नाही.
भारतातील शेतीचा ऱ्हास होण्याची कारणे
१)आपल्याच देशातील जमीन जरी सर्वगुणसंपन्न असली तरी शेतकरी तरी पण शेतकऱ्यांना योग्य असा हमीभाव मिळत नाही .
२)सध्या रासायनिक खतांचा दर सुद्धा वाढत चालला आहे
३)बऱ्याच शेतकऱ्यांकड शेतजमीन आहे पण ती जमीन पीकवण्यासाठी सिंचनाची सोय नाही.
भारतातील शेतीचा ऱ्हास होण्याची कारणे
आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणी आपल्या देशातील 70टक्के लोकांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे .आपल्या देशातील शेतकरी तस खुप कष्ट करणारा असा शेतकरी आहे.पण शेतीत येत असणाऱ्या आर्थिक समस्यातून शेतकऱ्यांना बाहेर पडता येत नाही
आपल्या शेतकऱ्यांना आसमानी संकटाचा ही सामना बऱ्याच वेळा करावा लागतो व त्यामुळेच जर एखाद्या वेळेस जर मोठ्य
प्रमाणावर पाऊस जर झाला तर ते पाणी जर पीकात साठून राहिल तर ते पीक खराब होऊन जात.
जर एखाद्या वेळेस जर पाऊस झाला नाही आणी त्या शेतकऱ्यांकड पाणी साठवून ठेवण्यासाठी विहीर किंवा शेततळ जर नसेल तर तो शेतकरी आपल्या पीकांना पाणी देउ शकत नाही .