भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2026
[[भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना2026]]
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2026 ही योजना महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राबविण्यात येणारी योजना आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे .
जसं की डाळिंबाची बाग असेल किंवा नारळाची बाग असेल किंवा चिकू पेरूची लागवड करायची असेल तर अशा लागवडीसाठी शासनामार्फत आपल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे.
कारण शेतकऱ्यांना जर डाळिंबाची बाग लावायची असेल तर त्यांना शेतात खड्डे काढण्यासाठी जो काही खर्च येतो.
तो खर्च शेतकऱ्यांना स्वतः करण शक्य होत नाही यासाठीच शेतकऱ्यांना खड्डा खणताना असेल किंवा लोकांना लागणारी जी खते महाग असल्यामुळे ते टाकणं शेतकऱ्यांना परवडत नाही व त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पिकांना खते टाकता याव यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना खते देण्यासाठी काही अडचणी येणार नाहीत.
[[भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना2026 या योजनेची वैशिष्ट्ये ]]
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 2026 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येते हे अनुदान शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते.
१) जर आपणास फळबाग लागवड करायची असेल तर या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान मिळते
२) आपल्याला रोप खरेदी करण्यासाठी सुद्धा आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळते
३) आपल्याला रोप लागवडीसाठी जे खडे पाडायचे आहेत ते खड्डे पाडण्यासाठी सुद्धा शासनांतर्गत अनुदान मिळते
आपल्याला जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान आपल्याला प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
Nice
पहिल्या वर्षी आपल्याला 50 टक्के अनुदान मिळणार आहे व उरलेले अनुदान दुसऱ्या वर्षी 30 टक्के अनुदान मिळणार आहे
आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान मिळणार आहे अस एकूण शंभर टक्के अनुदान आपल्याला फळबाग लागवडीसाठी मिळणार आहे
या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे तो शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
[[भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना2026 या योजना पात्रता व अटी ]]
[[ पात्रता]]
१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे .
२) ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
३) या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी पात्र असतील.
४) या योजनेचा लाभ जर महिला शेतकरी असतील तर त्या महिलांना विशेष प्राधान्य आहे
[[अटी ]]
१) जर आपण फळबाग लागवड करणार असेल तर आपणास ठिबक सिंचन वापरणे अनिवार्य आहे.
२) या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असणे आवश्यक आहे.
[[भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना2026 आवश्यक कागदपत्रे ]]
१) आधार कार्ड
२) सातबारा उतारा
३) बँक पासबुक
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना2026 या योजने साठी अर्ज कसा करावा.
१)MahaDBT पोर्टल ला भेट द्या
2)शेतकरी नवीन अर्जदार नोंदणी करा
3)फळबाग लागवड योजना' अंतर्गत अर्ज निवडून अर्ज भरा .
४)आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
FAQ
१)भाऊसाहेब फंडकर फळबाग योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आधार, ७/१२ उतारा, ८-अ प्रमाणपत्र सोबत ठेवा. संस्थात्मक लाभार्थी पात्र नाहीत; लहान, अल्पभूधारक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग शेतकऱ्यांना प्राधान्य; मनरेगा (MGNREGA) सहभागींनी प्रथम त्या योजनेचा वापर करणे आवश्यक आहे.
२)फुंडकर फळबाग योजना म्हणजे काय आणि त्याचे लाभ कोणते आहेत?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2026. महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी 90% ते 100% पर्यंत अनुदान दिले जाते.
३)महाराष्ट्रात केळी अनुदान योजना आहे का?
योजनेमध्ये केळीसाठी पहिल्या वर्षी जमीन तयार करणे, रोपे लागण, आंतर मशागत व पीक संरक्षणासाठी १ लाख ९७ हजार ७२४ रुपये, दुसऱ्या वर्षात भरणी, खते, मशागतीसाठी ४९ हजार ७९६ तर तिसऱ्या वर्षी खते, पाणी व पीक संरक्षणासाठी ४१ हजार ८०० रुपये असे एकत्रित २ लाख ८९ हजार २२० रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.18 May 2025
४)शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते?
₹14,433 ते ₹75,000 पर्यंत अनुदान — शेततळ्याचा आकार आणि प्रकारानुसार.
काही माहिती हळूहळू ₹50,000 पर्यंत अनुदानाचीही माहिती देतो — परंतु अधिकारिक रक्कम आकारानुसार निश्चित होते
५)गाय गोठा अनुदान किती आहे
महाराष्ट्रात 'शरद पवार ग्राम समृद्धी योजने' अंतर्गत गाय-म्हैस पक्का गोठा बांधण्यासाठी २ ते १८ जनावरांसाठी अंदाजे ७७,१८८ रुपयांपासून ते २ लाख ३१,५६४ रुपयांपर्यंत (काही ठिकाणी ३ लाखांपर्यंत) अनुदान दिले जाते, जे तीन टप्प्यांत थेट बँक खात्यात जमा होते [१, २, ७, ८].
Post a Comment